fbpx

केसीई अभियांत्रिकी महाविद्यालयात “अभियांत्रिकी दिवस ” साजरा

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२१ । खान्देश कॉलेज एज्युकेशन संचलित अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालय, जळगांव“अभियांत्रिकी दिवस” साजरा करण्यात आला .

याप्रसंगी कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय सुगंधी, अकॅडमिक डीन डॉ. प्रज्ञा विखार आणि स्किल डेव्हलपमेंट विभागाचे प्रो. संजय पावडे, प्रो.नितीन मटकरी उपस्थित होते.

mi advt

सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनी, भारतीय अभियंत्यांचे श्रध्दास्थान आणि “भारतरत्न” याच्या प्रतिमेला अभिवादन करणात आले. आपल्या भारत देशाच्या जडणघडणीत सरांचे मोलाचे योगदान आहे असे मत अकॅडेमिक डायरेक्टर प्रो.संजय दहाड यांनी मांडले. सादरीकरणाद्वारे त्यांच्या कार्याची आणि कर्तृत्वाची माहिती देण्यात आली.विद्यार्थ्यांनतर्फे ऑनलाईन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख आणि प्राध्यापकवर्ग उपस्थित होता.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज