वायला येथे संविधान दिन साजरा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ नोव्हेंबर २०२१ । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी वनसनिध्याच्या परीसरात असलेल्या गावात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

सरपंच आरती इंगळे यांनी दिप प्रज्वलीत करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पुजन केले. प्रसंगी पोलीस पाटील भिमराव तायडे, उपसरपंच संतोष कोळी, ग्राम पं.सदस्या आशा इंगळे, रविंद्र निकम, अंगणवाडी सेविका अरुणा निकम, आशा वर्कर छाया ठाकरे, शिक्षक रामेश्वर आघाडे, शिपाई श्रीकृष्ण कोळी,राहुल इंगळे, शरद तायडे, जिवन वानखेडे, कमलाकर इंगळे, मुकेश धुरंदर, मधुकर पाटील आदीसह ग्रामस्थांची उपस्थिती लाक्षणिक होती.

दरम्यान संविधान उद्देशिकाचे सामुहिक वाचन करण्यात आले.दहशत वाद्यांच्या २६/११ च्या झालेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना आदरांजली वाहण्यात आली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -