जिल्ह्यात प्रत्येक शिवभोजन केंद्रात सीसीटीव्ही अनिवार्य

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२२ । जिल्ह्यात प्रत्येक शिवभोजन केंद्रात सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे अनिवार्य केले असून, ही कार्यवाही ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याची सूचना पुरवठा विभागाने सर्व केंद्रचालकांना दिली आहेत. शिवभोजन योजनेची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी व केंद्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

संपूर्ण केंद्राची जागा व्यापेल अशा पद्धतीने सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी व शिवभोजन वाटपाच्या कालावधीतील कमीत कमी मागील ३० दिवसांचे प्रक्षेपण तपासणीसाठी उपलब्ध राहील याची दक्षता घ्यावी, असे म्हटले आहे. प्रक्षेपणाचा डाटा आवश्यकता असेल तेव्हा तपासणीसाठी पेन ड्राइव्हमध्ये वा स्टोरेज डिव्हाइसमध्ये उपलब्ध करून द्यावा. केंद्राच्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता विचारात घेऊन पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे.

शिवभोजन केंद्राची बिले अदा करताना तसेच कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यास किंवा अनियमितता आढळून आल्यास केंद्रातील प्रक्षेपणाची तपासणी करून कारवाई करण्यात येणार आहे. तक्रारप्राप्त प्रकरणांवर अंतिम आदेश देईपर्यंत संबंधित प्रक्षेपण जतन करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी, अशा सूचना केंद्रचालकांना दिल्या आहेत.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar