⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | जामनेर | जामनेर शहरातील सीसीटीव्ही लंपास

जामनेर शहरातील सीसीटीव्ही लंपास

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२२ । जामनेर नगरपालिकेने शहरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीच चोरी झाली आहे. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरील झालेला एक कोटी रूपये व्यर्थ ठरला आहे. तर कॅमेरे सुरू करण्याबाबत आमदार गिरीश महाजन यांनी वारंवार सूचना केल्या आहेत. मात्र अद्याप कॅमेरे सुरू होऊ शकलेले नाहीत.

मंत्री असतांना आमदार गिरीश महाजन यांनी शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर ९४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. त्यासाठी एक कोटी चार लाख रूपये खर्च करण्यात आला. मात्र गेल्या सात वर्षात ९४ पैकी केवळ चार कॅमेरे सुरू होऊ शकले होते. कालांतराने तेही बंद पडले. शहरात चोऱ्या वाढल्या की पोलिस यंत्रणेकडून सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यासाठी पालिकेकडे पाठपुरावा केला जातो. माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनीही पालिकेला कॅमेरे सुरू करण्याच्या सुचना दिल्या आहेत. मात्र सात वर्ष उलटूनही कॅमेरे सुरू न झाल्याने खर्च व्यर्थ ठरला आहे.

जामनेर पालिकेतर्फे शहरातील पाचोरा रोड, भुसावळ रोड, जळगाव रोड, वाकीरोड अशा प्रमुख रस्त्यांवर ९४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. शहरातील घडमोडींवर नजर ठेऊन विशेषत: गुन्हेगारीवर नजर ठेवण्यासाठी या कॅमेऱ्यांचा उपयोग होणार होता. मात्र बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यांपैकी अनेक ठिकाणच्या कॅमेऱ्यांचीच चोरी झाली असून एखादी घटना घडली की तेवढ्यापुरती सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची आठवण होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह