fbpx

सावदा शहरातील चौफुली व मुख्य रस्त्यावर सि.सि.टी.व्ही. कॅमेरे लावाव्यासाठी निवेदन

mi-advt

 

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२१ । सावदा शहरातील चौफुली व मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावावे, असे निवेदन बेटी बचाओ बेटी पढाओ जळगाव जिल्हा संयोजक सारीका चव्हाण यांनी आज नगरपालिक मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांना दिले आहे. निवेदन देते वेळी नगरसेवक राजेंद्र चौधरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सावदा शहर ३८ गावांची मुख्य बाजारपेठ आहे. इथे मोठा आठवडे बाजार, गुरांनचा बाजार व केळीची मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात व्यवसायीक व खरीददार येत असतात. त्यामुळे शदर गजबजलेले असते. त्यामुळे अपप्रवृत्तीचे लोक छोटे-मोठे गुन्हेगार यांचा सतत वावर असतो. अशा लोकांवर व शहराचा रक्षणासाठी प्रशासनातर्फे काहीतरी वचक हवा म्हणून नगरपालिका व प्रशासनाच्या व व्यवसायीक
आस्थापनाच्या माध्यमातून आपण सावदा शहरात सी.सी. टी.व्ही. लावून देण्याची व्यवस्था करून दयावी. अशी मागणी केली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज