अ‍ॅड.रोहिणी खडसेंवरील हल्ल्याची सीबीआय चौकशी करावी : गजानन मालपुरे

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२१ । जिल्हा बँकेच्या संचालिका अ‍ॅड.रोहिणी खडसे यांच्यावरील झालेला हल्ला हा भ्याड आणि निषेधार्ह असून याची सीबीआयच्या माध्यमातून निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गजानन मालपुरे यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा तथा विद्यमान संचालिक रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सर्व स्तरांमधून निषेध करण्यात येत आहे. या हल्ल्याचा आता शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते गजानन मालपुरे यांनी देखील निषेध केला आहे. या संदर्भात त्यांनी सोशल मिडियात एक लेखी निवेदन जारी केले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, अ‍ॅड.रोहिणीताई खडसे यांच्या वर ज्या भ्याड पध्दतीने हल्ला करण्यात आला आहे त्याचा जाहिर निषेध करत आहे. सामाजिक जीवनात काम करणार्या महिलांनावर अश्या पध्दतीने भ्याड हल्ले होत राहिले सामाजिक काम करण्यासाठी महिला पुढे येणार नाहीत त्यामुळे ह्या हल्ल्यातील संशयित असलेले गुन्हेगार हे नुसते राजकीय पक्षाशी संबंधित नसुन जबाबदार पदाधिकारी आहेत व रोहिणीताई ह्या एकनाथराव खडसे यांच्या कन्या आहेत ह्या हल्ल्यामागे नेमके काय राजकारण आहे याचा खरा सुत्रधार समोर येण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दला समोर कठीण परीक्षा राहणार आहे. यामुळे यातुन गुन्हेगारांना शासन होण्यासाठी कुठंतरी दबावाखाली तपास होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. यामुळे संबंधीत प्रकरणाचा तपास निःपक्षपाती होण्यासाठी सीबीआय चौकशी करण्याची आवश्यकता आहे. यामुळे या हल्ल्याचा तपास त्वरित सी बी आय कडे वर्ग करुन योग्य तपास होऊन गुन्हेगारांना शासन करण्यात यावे अशी मागणी गजानन मालपुरे यांनी या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -