कुरंगी येथे दहशत माजवलेल्या वानराला अखेर पकडले

 

गेल्या तीन महिन्यांपासुन कुरंगी गावात हल्लाखोर वानराने १०० च्या वर दुचाकी गाड्यांचे नुकसान केले होते.एवढेच नव्हे तर तो मागील ८-१० दिवसांपासुन गावातील नागरीक व महिला आणि लहान मुलांवर हल्ला चढवत जवळपास १५-२० लोकांवर हल्ला केल्याने एकच दहशत परीसरात माजली होती.हे वानर आल्यानंतर एकच कल्लोळ आणि धुमाकूळ माजली होती.

शेवटी वनविभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी देवरे साहेब यांनी अजयकुमार जैस्वाल यांनी फोन करून सुचना दिल्यानंतर आपल्या पथकासह गावात दाखल होऊन आज आतिषजी चांगरे यांच्या मेहनती नंतर तब्बल दोन तासानंतर हल्लाखोर दोन वानरांना पकडण्यात फार मोठे यश आले असुन – या कामगिरीनंतर कुरंगीकरांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.समस्त कुरंगी नागरीकांतर्फे आतीष’जी चांगरे आणि वनविभागाचे अधिकारी देवरे साहेब व त्यांचे पथकातील सदस्य – अभिनंदन व कौतुक करण्यात आले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज