गावठी कट्टा, काडतूस, तलवारसह एकाला जळगावात पकडले

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ डिसेंबर २०२१ । शहरातील बिबा नगरात राहणाऱ्या एका व्यक्तीकडे गावठी कट्टा आणि तलवार असल्याची माहिती मिळाल्याने तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी त्याच्या मुसक्या आवळल्या.

तालुका पोलीस स्टेशन हद्दीत बिबा नगरमध्ये असलेल्या नारायण नगरात राहणाऱ्या अनिल रघुनाथ भोई वय-३१ याने त्याचे घरी एक गावठी बनावटीचा कट्टा व लोखंडी तलवार ठेवली असल्याची माहिती सहा पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली होती. शुक्रवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील, पोलीस नाईक विश्वनाथ गायकवाड, महेश महाले, रवींद्र मोतीराया, तुषार जोशी, संजय भालेराव, दिनेश पाटील, अशोक महाले तसेच महिला हवालदार शोभा न्याहळदे अचानक अनिल भोई याच्या घरी छापा टाकला.

पथकाने घर झडती घेतली असता एक गावठी कट्टा, ४ जिवंत काडतुस व एक लोखंडी तलवार असे त्याच्या घरात मिळून आले आले आहे. आरोपी अनिल भोई विरुद्ध पोलीस नाईक विश्वनाथ गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -