चोरटी वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले, गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२२ । खेडी बुद्रुक परिसरात महसूल पथक गस्तीवर असताना ( एमएच १९ बीएम ४४४३ ) क्रमांकाचे डंपर वाळू वाहतूक करताना आढळून आले. ही कारवाई ४ रोजी झाली. डंपरचालक विरोधात तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

खेळी बुद्रूक परिसरातून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या डंपरवर महसूल विभागाने कारवाई केली. ही कारवाई नायब तहसीलदार राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनात ४ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता महसूल पथक गस्तीवर असताना पथकाने डंपर अडवून जप्त केले. या प्रकरणी डंपरचालक ज्ञानेश्वर प्रल्हाद कोळी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -