fbpx

पोलीस ठाण्यात मोबाईल चित्रीकरण करणाऱ्यावर गुन्हा दाखल

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२१ । शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात येऊन लॉकअपमध्ये असलेल्या आरोपींशी संभाषण करीत मोबाईलमध्ये चित्रीकरण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात महावितरण कार्यालयात गोंधळ घातल्याप्रकरणी चाळीसगाव येथील संशयितांना कोठडीत ठेवण्यात आले आहे. शनिवारी सकाळी ११.३० वाजता प्रवीण मराठे, रा.चाळीसगाव हे लॉकअप रूम जवळ आले. लॉकअपमध्ये असलेल्या आरोपींशी त्यांनी संभाषण केले आणि त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण देखील केले. पोलिसांच्या हा प्रकार लक्षात आल्याने प्रवीण मराठे यांना ताब्यात घेत गोपनियतेचा भंग केल्याने त्यांच्याविरुद्ध पोलीस नाईक राजेंद्र ठाकरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज