अवैधरित्या वाळू वाहतूकप्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२१ । गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांवर महसूलसह पोलीस प्रशासनाकडून सोमवार दि.८ रोजी कारवाई करण्यात आली होती. याकारवाईत ८ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून याप्रकरणी ८ ट्रॅक्टर चालक व मालकांवर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोणतीही कायदेशीर परवानगी नसताना सावखेडा शिवारातील गिरणा नदी पात्रातून वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर सोमवार दि.८ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास महसूल प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत नदीपात्रातून वाळू भरणारे ८ ट्रॅक्टर ट्रालीसह व २ दुचाकी असा १६ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी मंडळ अधिकारी योगेश्वर भगवान नन्नवरे यांच्या फिर्यादीवरून दिनेश चांगो भोई (रा. हरिविठ्ठलनगर, जळगाव), रवी सर्जू राठोड (रा. समतानगर, जळगाव) यांच्यासह ६ ट्रॅक्टर चालक व मालकांवर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कल्याण कासार करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज