जळगावात तरूणीचा विनयभंग, एकावर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२१ । जळगाव जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाऱ्याच्या घटना वाढताना दिसत आहे. अशात जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात २२ वर्षीय तरूणीचा विनयभंग केला. शिवाय तरूणीच्या आईला देखील मारहाण करून अश्लिल शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की, एमआयडीसी परिसरातील एका भागात २२ वर्षीय तरूणी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून ६ रोजी तरूणी आपल्या आईसोबत किरणा माल घेण्या साठीपायी जात होत्या. त्यावेळी संशयित आरोपी सुभाष आकुलकर (पुर्ण नाव माहित नाही) हा तरूणीजवळ येवून मागील भांडणाचे कारणावरून तरूणीचा हात पकडला. तिला शिवीगाळ करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केल. शिवाय तरूणीच्या आईला देखील मारहाण करून अश्लिल शिवीगाळ केली. तसचे तुम्हाला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.

तरूणीने याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. तक्रारीवरून संशयित आरोपी सुभाष आकुलकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ योगेश सपकाळे करीत आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -