fbpx

गफ्फार मलीक यांच्या अंत्यसंस्काराला गर्दी केल्याने अखेर गुन्हा दाखल

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२१ । येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हाजी गफ्फार मलिक यांच्या अंत्यसंस्काराप्रसंगी उसळलेल्या गर्दीत शासकीय नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी अखेर शनिपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंत्यसंस्काराला होणाऱ्या गर्दीचे व्हिडीओ सोशल मिडियात व्हायरल झाले होते तसेच माध्यमातून देखील चित्रीकरण करण्यात आले होते. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हाजी गफ्फार मलिक यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दिनांक २५ मे रोजी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशासनाने आवाहन केल्यानंतर देखील अंत्यसंस्काराला हजारोंचा जनसमुदाय त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाला होता.

घराकडून अंत्यसंस्कारचा जनाजा निघाल्यानंतर फिजीकल डिस्टन्सींगच्या फज्जा उडवत हजारोंचा जमाव त्यात सहभागी झाला होता. शनीपेठ पोलिसांकडून वारंवार लाऊडस्पीकरद्वारे आवाहन केले जात असतानाही नागरिक साध्य लागू असलेल्या कडक निर्बंधांचे उल्लंघन करताना दिसून आले.

एकीकडे लग्न, मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर कारवाई केली जाते आणि दुसरीकडे अंत्यसंस्काराला गर्दी करणाऱ्यांवर प्रशासन या प्रकरणी कारवाई करणार का? असा प्रश्‍न माहिती अधिकार कार्यकर्ते तथा सोशल अ‍ॅक्टीव्हीस्ट दीपककुमार गुप्ता यांनी तातडीने ट्विटरवरून प्रशासनाला विचारला होता. यात त्यांनी मुख्यमंत्र्यांना आणि पोलीस प्रशासनाला ही टॅग केले होते.

दुसऱ्या दिवशी सोशल मीडियातून अनेक संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. दरम्यान, दीपककुमार गुप्ता यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर या प्रकरणी शनिपेठ पोलीस स्थानकामध्ये एजाज अब्दुल गफ्फार मलिक, नदीम अब्दुल गफ्फार मलिक आणि फैजल अब्दुल गफ्फार मलिक यांच्यासह अन्य ५० जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांच्या विरूध्द भादंवि कलम १८८, २६९ सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनयम ५१ ब च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक व्ही. डी. ससे व उपनिरिक्षक अमोल कवडे हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज