fbpx

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार ; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२१ । लग्नाचे आमिष दाखवून ३१ वर्षीय महिलेवर वेळोवेळी बलात्कार केल्या प्रकरणी एकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेचे २०१० मध्ये पहिले लग्न झाले आहे. पहिल्या पतीपासून एक मुलगादेखील आहे. आपसांतील वादातून या महिलेने पहिल्या पतीपासून घटस्फोट घेऊन वर्धा येथील तरुणाशी २०१७ मध्ये दुसरे लग्न केले.

याबाबत असे की,  पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्याने माहेरच्या लोकांनी महिलेपासून संपर्क तोडला होता, ते बोलत नव्हते. अशातच दुसऱ्या पतीपासूनही एक अपत्य झाले. याच काळात जळगावातील कमलेश ऊर्फ बंटी जयपाल मखीजा (रा.सिंधी कॉलनी) या तरुणाशी सोशल मीडियावर ओळख झाली. काही दिवसांनंतर त्याच्याशीही वाद झाल्याने विवाहिता जळगावात कमलेशच्या घरी आली. तेथे त्याच्या कुटुंबीयांनी तुझ्या पतीपासून घटस्फोट घेत असेल तर कमलेशशी लग्न करायला आमची हरकत नाही असे सांगितल्याने महिलेने तशी तयारी दर्शवली.

दरम्यान, काही दिवस या तरुणाकडे थांबल्यानंतर ही महिला पुन्हा वर्धा येथे पतीकडे गेली. त्यानंतर पुन्हा जळगावात कमलेशच्या घरी आली. जून ते १० ऑगस्ट या कालावधीत कमलेश याने लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे. याच काळात कोर्ट व इतर कामासाठी दोन लाखांच्यावर रक्कम देखील कमलेशला दिली. त्याने ती रक्कम देण्यास नकार दिला. सारखा तगादा लावल्यानंतर ही रक्कम परत मिळाली, मात्र लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला व लग्न केले नाही म्हणून विवाहितेने तक्रार दिली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt