fbpx

बारागाड्या उत्सवात नियम भंग झाल्याने १९ जणांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ मे २०२१ । राज्यासह जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असतानाही जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथे बारागाड्या ओढण्यात आले. यावेळी उत्सवात ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली आणि त्यातील लोकांनी कोरोना नियमांचे पालन केले नाही म्हणून उत्सवाचे आयोजक आणि पुजाऱ्यासह १९ ग्रामस्थांवर तालुका पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या उत्सवातील गर्दीचे छायाचित्र आणि वृत्त शुक्रवारी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर पोलिसांनी हे पाऊल उचलले.

हा उत्सव प्रतिकात्मक साजरा करण्यासाठी तालुका पोलिसांनी परवानगी दिली होती. त्यासाठी पोलिस बंदोबस्तही देण्यात आला होता. मात्र, उत्सव प्रतिकात्मक साजरा करण्याऐवजी एक गाडी मरिमाता मंदिरापासून विसावा भागापर्यंत ओढत नेली. त्यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्याचे छायाचित्र आणि बातमीही माध्यमांमध्ये शुक्रवारी प्रकाशित झाली.

mi advt

१९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

त्यानंतर त्या संदर्भात पोलिस हवालदार अनिल फेगडे यांनी तालुका पोलिस ठाण्यात शुक्रवारी फिर्याद दिली. त्यानुसार सरपंचांचे पती भगवान सदाशिव पाटील, पुजारी दगडू राजाराम भागवत, गोपीचंद भागवत पाटील, इघन रामा मोरे, तुकाराम मोहन पाटील, अमोल तेजपाल चौधरी, दगडू तुकाराम सुरवाडे, अजय साहेबराव पाटील, दिनकर जयसिंग चौधरी, पंकज जनार्दन चौधरी, अंकुश नामदेव पाटील, नवल पंडित पाटील, लहू नामदेव पाटील यांच्यासह अनोळखी पाच ते सहा व्यक्तीअशा १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज