श्रीराम वहनोत्सवात आज निघणार चंद्राचे वहन ; असा आहे वहन दिंडी मार्ग

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ । जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्या विद्यमाने सुरू असलेल्या श्रीराम वहनोत्सवातील आजचे वहन श्री चंद्राचे आहे. आज (दि.११) संध्याकाळी ७ वाजता श्रीराम मंदिर संस्थानातून वहन नगरप्रदक्षिणेला सुरुवात हाेणार आहे.  तसेच ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे. काेराेनाचे नियम पाळून हे कार्यक्रम हाेणार आहे.

श्रीराम वहनोत्सवात गुरुवारी चंद्राचे वहन आहे. हरणाच्या गाडीवर बसून रोज रात्री आकाशातून दिमाखाने फिरणारा चंद्र हा माणसाचा मनाचा प्रतिक आहे. ज्याप्रमाणे माणसाचे मन कधी कलेच्या सद््गुणांनी विकसित होते. तर कधी दुर्गुणांच्या अमावस्येने काळवंडून जाते. चंद्रायण वृत्त करणारे पौर्णिमेपासून पौर्णिमेपर्यंत याच चंद्रनारायणाचे दर्शन घेत धन्य होतात. भाऊ नसलेली बहिण याच चंद्राला भाऊ म्हणून ओवाळते.
चंद्र हा सुख-समृद्धीचे प्रतिक आहे. याचे चंद्रासोबत गुरुवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास श्रीराम मंदिर संस्थानातून नगरप्रदक्षिणेला सुरुवात हाेणार आहे.

असा आहे वहन दिंडी मार्ग :

सायंकाळी ७ वाजता गादीपती मंगेश महाराज यांच्याहस्ते श्रीराम मंदिर संस्थानात वहन पूजनासह आरती होईल. त्यानंतर वहन श्रीराम मंदिरातून निघून भोईटे गढी, कोल्हे वाडा, आंबेडकर नगर, गोपाळपुरामार्गे नगरसेवक भरत कोळी यांच्याकडे वहन आरती आणि पानसुपारीचा कार्यक्रम होईल. तेथून खेडी रोडवरील ज्ञानेश्वर बारी यांच्याकडेही आरती आणि पानसुपारीचा कार्यक्रम होईल. त्यांनतर वहन तेली चौक, मारोती पेठमार्गे रथ चौक मंदिरात येईल. या ठिकाणी आरती होऊन मंगेश महाराज यांच्याहस्ते भक्तांना श्रीफळ देण्यात येईल.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज