पाचोऱ्यात मालवाहू गाडी-दुचाकीची धडक; एक ठार, एक जखमी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२१ । पाचोरा शहरात मालवाहू टाटा मॅजिक गाडी व मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. त्यात मोटारसायकलस्वार नईम खान युनूस खान (वय २४) हा जागीच ठार झाला तर त्याच्यासाेबत असलेला एक जण जखमी झाला आहे. हा अपघात शहरातील रेल्वे पुलाजवळील दैवयोग मंगल कार्यालयानजीक शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास झाला.

सविस्तर असे की, शहरातून भडगावकडे भरधाव मालवाहू टाटा मॅजिक (एम.एच. ०४, ईवाय १४८९) जात हाेता. त्याने भडगावकडून पाचोरा शहराकडे येणाऱ्या मोटारसायकल (क्र.एम.एच. १९, सी.डी. ३७०८) ला जोरदार धडक दिली. त्यामुळे मोटारसायकलवरील नईम खान युनूस खान (वय २४) रा.बाहेरपुरा, पाचोरा या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला संतोष खेमराज चव्हाण (वय २१) रा. वडगाव जोगे, ता.पाचोरा हा तरुण गंभीर जखमी झाला. मृत नईम खान व संतोष चव्हाण हे हात मजुरीचे काम करत असून आपले दैनंदिन काम आटोपून ते घरी जात असतांनाच हा अपघात झाला.

जखमी संतोष चव्हाण याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत नईम खान काँग्रेसचा कार्यकर्ता असून त्याच्या निधनाने पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी दु:ख व्यक्त करत तत्काळ घटनास्थळी धाव घेतली हाेती.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -