fbpx

नशिराबाद नजीक कारचा भीषण अपघात ; दोन युवक ठार

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ जुलै २०२१ । राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील नशिराबाद नजीक भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण जागेवरच ठार झाल्याची घटना आज गुरुवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. अभिजित सुभाष पसारे (वय-३०, रा. डोंबीवली ता.जि.ठाणे) व पवन नंदू बागुल (वय-२७, रा. मानपाडा. ठाणे) असे या अपघातात मृत तरुणांचे नाव आहे. दरम्यान, याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

याबाबत असे की, अभिजित पसारे यांचा भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील एका तरुणीशी साखरपुडा झाला आहे. ते त्यांचे होणारे सासरे आजारी असल्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले होते. त्यांना पाहण्यासाठी भावी पत्नी व सासू हे देखील मुंबईत येथे आल्या होत्या. दरम्यान अभिजित पसारे यांनी भावी पत्नी व सासूला सोडण्यासाठी भाड्याची कार करून ७ जुलै रोजी सायंकाळी साकेगाव येथे सोडण्यासाठी मित्र पवन बागुल सोबत आले होते. 

दरम्यान, त्यांना सोडल्यानंतर ते परत मुंबईकडे जात असताना नशिराबाद नजीक सरस्वती फोर्डजवळ त्यांचा कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या बाजूला आदळली. त्यात अभिजित पसारे हा तरूण जागीच ठार झाला तर पवन बागुल गंभीर जखमी झाला होता. जखमी पवनला तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान पवनचाही मृत्यू झाला. 

मयत पवन बागुलच्या पश्चात आई मनिषा, पत्नी जयश्री असा परिवार आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.  

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज