ममुराबाद नजीक जळगाव पं. स. सभापती कोळींच्या कारचा अपघात

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२१ । जळगावकडून विदगावकडे निघालेल्या जळगाव पंचायत समितीच्या सभापती ललिता पाटील यांच्या इनोव्हा कारचे पुढील टायर फुटल्याने गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार झाडाला धडकली. यात त्यांचे पती जनार्दन कोळी हे गाडीत एकटेच होते. त्यांना अपघातात किरकोळ दुखापत झाली. हा अपघात सोमवारी रात्री ममुराबाद-विदगाव रस्त्यावर घडला

याबाबत असे की, जनार्दन काेळी हे कारने (एमएच-३९, क्यू ८६८६) जळगावात कामानिमित्त गेले होते. रात्री सुमारे साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास घरी विदगाव येथे परत जाताना त्यांच्या गाडीचे पुढील टायर ममुराबाद गावापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर लाकडाच्या वखारीजवळ फुटले. त्यामुळे नियंत्रण सुटल्याने त्यांची भरधाव कार रस्त्याच्या खाली उतरून बाभळीच्या मोठ्या झाडावर धडकली.

अपघातात कारचे नुकसान झाले. एअर बॅग योग्य वेळी उघडल्याने कोळी यांना जास्त दुखापत झाली नाही. या अपघातानंतर सभापती कोळी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जळगाव येथे एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -