⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | गांजा तस्करी प्रकरण : तरुणीला १८ पर्यंत पोलीस काेठडी

गांजा तस्करी प्रकरण : तरुणीला १८ पर्यंत पोलीस काेठडी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२२ । पुरी-गांधीधाम एक्स्प्रेसमधून गांजाची वाहतूक केल्याप्रकरणी लोहमार्ग पाेलिसांनी एक अल्पवयीन मुलगा व २० वर्षांची मुलगी अशा दोघांना ताब्यात घेतले. संजना ठाकूर (वय २०, रा.भाेपाळ, मध्य प्रदेश) असे संशयित मुलीचे नाव आहे. संशयिताला अटक करून न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने १८ फेब्रुवारी पर्यत पोलिस काेठडी सुनावली आहे.

सविस्तर घटना अशी की, रविवारी भुसावळ रेल्वे स्थानकावर पुरी-गांधीधाम एक्स्प्रेसमधून अल्पवयीन असलेले मुलगा व मुलगी खाली उतरले. त्यांच्याजवळ दाेन गाठाेडे हाेते. लोहमार्ग पोलिसांना संशय आल्याने त्यांनी गाठाेडे उघडून पाहिल्यावर सुमारे २० किलाे गांजा आढळला. पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांनी नायब तहसीलदार शशिकांत इंगळे यांना साेबत घेत पंचनामा करून जप्त केलेल्या गांजाचे वजन केले. त्यात तो २० किलाे भरला. या गांजाची किंमत सुमारे दाेन लाख रूपये अाहे. याप्रकरणी पाेलिसांनी दाेन्ही अल्पवयीनांना ताब्यात घेत चौकशी केली. त्यात दोघांनी सांगितलेली नावे खाेटी असल्याचे निरीक्षक घेरडे यांच्या लक्षात आले. मात्र, काही दिवस मध्य प्रदेशात सेवा दिल्याने घेरडे यांनी तेथील पोलिसांच्या मदतीने त्यांनी दाेन्ही संशयित मुलांची खरी नावे शाेधून काढली. त्यात मुलगा अल्पवयीन असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी २० वर्षांच्या संजनाला अटक करून न्यायालयात हजर केले.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह