गांजा तस्करी : दोन्ही संशयित पसार, धुळ्यात शोध

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जानेवारी २०२२ । भुसावळ शहरातील रेल्वे स्थानक परिसरातून बाजारपेठ पोलिसांनी ३३ किलो गांजा जप्त केला होता. याप्रकरणी दोघांना अटक, तर दोन जण पसार झाले होते. या दोघांचा ठिकठिकाणी शोध सुरू आहे. या दोघांपैकी एका संशयितावर सोनगीर पोलिसांत गांजा तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल आहे.

सविस्तर असे की, बाजारपेठ पोलिसांनी रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी रात्री उशिरा नाकाबंदी केली होती. त्यात वाहनांची तपासणी सुरू असताना स्विफ्ट (एमएच.०१- बीटी.६६८२) कारमधील प्रवाशांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. यामुळे पोलिसांनी वाहनाची तपासणी केली. या कारच्या डिकी मध्ये ३३ किलो गांजा सापडला होता. या प्रकरणी कार चालक विजय वसंत ठिवरे (वय ४६, घर क्रमांक १०५, मिरजकर नगर, चाळीसगाव रोड, धुळे) आणि नंदकिशोर हिरामण गवळी (वय २८, रा.पवन नगर, चाळीसगाव रोड, धुळे) यांना अटक करण्यात आली. इतर दोघे पोलिसांच्या हातावर तुरी देत बस स्थानकातून पळून गेले होते. दरम्यान, गुरुवारी दोघा संशयितांना तीन जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळाली होती.

जंक्शनवरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात

बाजारपेठ पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासासाठी रेल्वे सुरक्षा बलाकडून कारवाईपूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. संशयित स्थानकात शिरताना व बाहेर निघताना त्यात दिसत आहे. पोलिस या प्रकरणाच्या मुळाशी गेल्यास गांजा देणारा, पुरवठादार व खरेदीदारांची साखळी तपासात उघड होईल. तपास डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दिलीप भागवत करत आहेत.

मनमाडऐवजी भुसावळात झाली डीलिंग

या गुन्ह्यातील तीन संशयितांनी धुळ्याहून मनमाड व तेथून शिर्डी गाठले. परतीच्या प्रवासात धुळ्याहून एक कार भाड्याने मनमाडपर्यंत बोलावली. मनमाड येथे गांजा घेवून धुळ्यात जाण्याचे त्यांच नियोजन होते. मात्र,मनमाड ऐवजी भुसावळात गांजा घेण्याचे ठरले. त्यानुसार ते मनमाडहून कारने भुसावळात आले. रेल्वे स्थानकातून एका संशयिताकडून गांजा स्वीकारल्यावर पकडले गेले.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -