fbpx

महाविद्यालयीन फी रद्द करून ट्युशन फी मध्ये 20% सवलत मिळावी

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२१ । कोविड-१९ या महाभयंकर काळात सर्व महाविद्यालये बंद असून विद्यार्थी वर्गाच्या पालक वृंदाची आर्थिक परिस्थिती खूप नाजूक झालेली आहे. त्यामुळे महाविद्यालयीन अनावश्यक फी रद्द करून ट्युशन फी मध्ये 20% सवलत द्यावी, अशी मागणी इंजिनीअरिंग कृती समिती महाराष्ट्र राज्यच्या जळगाव जिल्हा युवक व युवती यांच्या वतीने करण्यात आली.

त्याप्रसंगी इंजिनीअरिंग कृती समितीचे खान्देश विभाग संघटक(युवती) मयुरी महाजन, जळगाव जिल्हाध्यक्ष(युवती) मोनालिका पाटील, उपाध्यक्ष राजपरी खैरे, कार्याध्यक्ष मोहिनी महाले, तसेच जिल्हा युवकचे कार्याध्यक्ष रविंद्र माळी, जळगाव तालुकाध्यक्ष चेतन बढे, तालुका कार्याध्यक्ष सनी भारंबे, तालुका संपर्क-प्रमुख आदित्य थोरात, व एरंडोल तालुकाध्यक्ष वरद विसपुते, उपाध्यक्ष प्रशांत पानपाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज