fbpx

रासेयोच्या शिबिरार्थीनी बांभोरी गावात राबविले स्वच्छता अभियान

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२१ । राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि रासेयोचे विभागीय संचालनालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पश्चिम विभागीय राष्ट्रीय सेवा योजना पूर्व प्रजासत्ताक दिन पथसंचलन निवड शिबिरातील शिबिरार्थीनी गुरुवार दि.१४ रोजी बांभोरी गावात स्वच्छता अभियान राबवून गाव स्वच्छ केले.

दहा दिवसीय शिबिरात सात राज्यातील दोनशे रासेयो स्वयंसेवक या शिबिरात सहभागी झाले असून गुरुवारी त्यांनी बांभोरी गावात स्वच्‍छता मोहिम राबविली. बसस्टॉप ते ग्रामपंचायत या भागात या स्वच्छता मोहिमेअंतर्गत केर कचरा, प्लॅस्टिक व इतर साहित्य  एकत्र करून गाव स्वच्छ केले. गावकऱ्यांनी या मोहिमेबद्दल समाधान व्यक्त केले. या अभियानाचा समारोप ग्रामपंचायत कार्यालयाजवळील मंदिरात झाला. यावेळी पुणे विभागाचे रासेयो संचालक डॉ. कार्तिकेयन यांनी आपल्या मनोगतात या मोहिमेची माहिती दिली. विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक प्रा. के.एफ. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी यावेळी रस्त्यावरील केरकचरा साफ करणाऱ्या बरोबर आपल्या डोक्यातीलही कचरा साफ करून मन स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. बांभोरीचे युवा सरपंच सचिन बिऱ्हाडे यांनी गावाची माहिती देतांना आपणही याच विद्यापीठाचे विद्यार्थी असून रासेयोतून जडण घडण झाल्याचे सांगितले.

mi advt

यावेळी नेहरू युवा केंद्राचे यशवंत वानखेडकर, रसिका अनेराव, रासेयो युवा अधिकारी अजय शिंदे, डॉ. मनिष करंजे, डॉ. सचिन नांद्रे, डॉ. विजय पाटील, प्रा. प्रशांत कसबे, डॉ. दिनेश पाटील, प्रा. दीपक सोनवणे, प्रा. साहेब पडलवार आदी उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्तविक रासेयो संचालक प्रा. पंकजकुमार नन्नवरे यांनी केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज