नशिराबादात शासकीय अर्ज भरुन देण्याचे अभियान

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । सुनिल महाजन नशिराबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे शेतकऱ्यांसाठी शासकीय अर्ज भरुन देण्याचे अभियान राबविण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज महाजन यांच्या नेतृत्वात परिसरातील क्षतिग्रस्त शेतकऱ्यांचे शासकीय अर्ज भरून देण्यात आले.

सविस्तर से की, गेल्या कित्येक दशकांपासून किंबहुना ब्रिटिश राजवटीत शेतीची झालेली मोजणी व त्यानुसार सातबाऱ्यांवर घेतलेल्या नोंदी या काळानुरूप अडचणीच्या व जाचक ठरू लागल्या होत्या. त्यात प्रामुख्याने सातबारावर असलेले पोटखराब क्षेत्र ज्याच्यामुळे जमिनीचा आकार मूल्य कमी असते, तसेच शासकीय दरांमध्ये संबंधित क्षेत्रात फार कमी म्हणजे नगण्य असलेली किंमत, यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचा व्यवहार करताना किंवा कर्ज घेताना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. एकूणच पोटखराब क्षेत्राचा मोबदला शेतकर्‍यांना अत्यल्प स्वरूपात मिळत होता. काळानुरूप प्रत्येक भागात बदल घडत असतात.शेतीच्या बाबतीतही संबंधित क्षेत्र हे लागवडीखाली आणले गेले असल्याने त्या जमिनीवर शेती किंवा बागायती शेती शेतकऱ्यांनी सुरू केली होती. पोटखराब क्षेत्र लागवडीस योग्य बनवले होते. विविध तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पोटखराब क्षेत्राचे पोत सुधारून लागवडीखाली आणण्यात आले होते. या प्रक्रियेला गेले अनेक वर्ष होऊन गेले परंतु संबंधित क्षेत्राची नोंद ही उताऱ्यावर पोटखराब म्हणूनच कायम होती.

शेतकऱ्यांची ही समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पोटखराब क्षेत्र वर्ग (अ) ची जमीन लागवडीखाली असल्यास, वहिती क्षेत्रात विलीनीकरणाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या स्तुत्य निर्णयाचा शेतकऱ्यांना प्रत्यक्षात लाभ मिळण्यासाठी, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नशिराबाद शहराच्या वतीने राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज महाजन यांच्या नेतृत्वात परिसरातील क्षतिग्रस्त शेतकऱ्यांचे शासकीय अर्ज भरून देण्यात आले.

शेतकऱ्यांना आनंद देणाऱ्या या निर्णयाचे अर्ज भरून देण्याचा अभिनव अभियान यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हा कार्याध्यक्ष सय्यद बरकत अली, सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा उपाध्यक्ष विनोद रंधे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नशिराबाद शहराध्यक्ष निलेश रोटे, देवेंद्र पाटील, शेखर पाटील, संकेत तळेले, सय्यद काझीम, खगेश कावळे, पुष्कराज रोटे, ललित रोटे, रमेश पाटील, किरण डॉक्टर, विकास पाटील, हर्षल वाघुळदे, पराग कोल्हे, शशिकांत येवले, प्रवीण पाटील, प्रसाद राणे यांनी परिश्रम घेतले.

सदर शासकीय निर्णय व्यापक स्वरूपात राबवण्यात आल्याने या अभिनव अभियानास जळगाव तहसीलदार नामदेव पाटील, नायब तहसीलदार सोनवणे, मंडळाधिकारी आशिष वाघ, नशिराबाद तलाठी रुपेश ठाकूर तसेच संतोष कोळी, वसीम आली यांचे अनमोल मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. त्याचप्रमाणे माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण भोई, प्रकाश माळी यांचे अनमोल सहकार्य मिळाले.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar