यावलात राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे संजय गांधी निराधार योजनेचे शिबिर

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२२ । राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित साधून यावल येथे राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने संजय गांधी निराधार योजनेचे शिबिर घेण्यात आले. त्यात तालुक्याचे माजी महिला अध्यक्षा द्वारकाताई पाटील यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

कार्यक्रम राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदनाताई चौधरी व पंचायत समिती सदस्य तथा संजय गांधी निराधार अनुदान अध्यक्ष शेखर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यावेळी आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष एम.बी. तडवी, युवक तालुका अध्यक्ष ऍड.देवकांत पाटील, महिला ता. अध्यक्ष प्रतिभा निळ, तालुका उपाध्यक्षा नंदा महाजन, तालुका कार्याध्यक्षा ममता आमोदकर, यावल शहराध्यक्षा निलिमा धांडे, संजय गांधी निराधार अनुदान समितीच्या सदस्या योगिता पाटील, युवक शहर अध्यक्ष हितेश गजरे, युवक तालुका समन्वयक किशोर माळी, युवक शहर कार्याध्यक्ष नरेंद्र शिंदे, यशवंत जासूद ओबीसी तालुकाध्यक्ष निवृत्ती धांडे, विद्यार्थी तालुका अध्यक्ष राकेश सोनार, युवक तालुका सरचिटणीस रोहन महाजन, गजानन पाटील बोरावल, दिलीप धनगर व विजय धांडे आदी उपस्थिती होते.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -