fbpx

किनगाव परिसरातील शेतातून लांबविल्या केबल वायर

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२१ । यावल तालुक्यातील किनगाव परिसरात पिकांना पाणी देण्यासाठी लावल्या वीजपंपांच्या केबल वायर चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच किनगाव (ता. यावल) परिसरात शेती अवजारांच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरतले आहे. शेतातून ८ दिवसात दोन वेळा विजपंपाच्या केबल वायरींची चोरीचा प्रकार किनगाव परिसरात घडला आहे. किनगाव येथील शेतकरी संदीप चुडामण पाटील, सिताराम महाजन, चंदू टेलर व किनगांव बुद्रूक ग्रामपंचायतीच्या मालकीचे मोटकरे शेत यांच्या शेतात ही चोरी झाली आहे. संदीप पाटील यांचे गट नं.१३ तर सिताराम महाजन, चंदू टेलर व ग्रामपंचायतीच्या मालकीचे चुंचाळे रस्त्यावर शेत आहे. गेल्या आठवड्यात यांच्या शेतातून अंदाजीत २० हजार रूपये किंमतीची विजपंपाची केबल वायरी चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. मात्र बागायत शेतीला पाण्याची आवश्यकता असल्याने सर्व शेतकऱ्यांनी विज पंप सुरू करण्यासाठी नव्याने २० हजार रूपयांच्या वायरी आणून पिकांना पाणी देण्यास सुरूवात केली. मात्र, दोन दिवस होत नाही तोपर्यंत दि.८ रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी पुंन्हा या केबल वायरी चोरून नेल्या आहेत. किनगावसह परीसरात भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झालेली असुन पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी परीसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज