पाचोरा तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींसाठी २१ डिसेंबरला पोटनिवडणूक

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । पाचोरा तालुक्यातील विविध १२ ग्रामपंचायतीतील १९ सदस्यांच्या रिक्त जागांसाठी २१ डिसेंबर रोजी पोट निवडणूक होणार आहे. याबाबतचे परिपत्रक नुकतेच निवडणूक आयोगाकडून काढण्यात आले आहे. यासाठी ३० नोव्हेंबरपासून नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार असून इच्छूक उमेदवारांकडून तयारीला वेग देण्यात आला आहे.

पाचोरा तालुक्यातील आसनखेडा बुद्रुक येथे पाच ग्रामपंचायत सदस्यांनी एकाच दिवशी राजीनामे दिल्याने व इतर ११ ग्रामपंचातींमध्ये विविध जातीचे उमेदवार न मिळाल्याने १९ सदस्यांच्या जागा रिक्त होत्या. त्या रिक्त जागांसाठी २१ डिसेंबरला पोट निवडणूक घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत. तसे परिपत्रक निवडणूक आयोगाने नुकतेच काढले आहे. या निवडणुकीसाठी ३० नोव्हेंबरपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार आहे. पाचोरा तालुक्यातील गाळण खुर्द प्रभाग एकमध्ये सर्वसाधारण स्री व नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग तीनमध्ये सर्वसाधारण स्री व अनुसूचित जमाती स्री, सारोळा बुद्रुक येथे प्रभाग क्रमांक एकमध्ये अनुसूचित जमाती स्री, पिंप्री बुद्रुक येथे प्रभाग क्रमांक एकमध्ये अनुसूचित जमाती स्री, खाजोळा येथील प्रभाग क्रमांक दोन सर्वसाधारण स्री, भोकरी येथे प्रभाग क्रमांक एकमध्ये सर्वसाधारण, वडगाव बुद्रुक (प्रपा) येथील प्रभाग क्रमांक एकमध्ये अनुसूचित जमाती, आसनखेडा बुद्रुक येथील प्रभाग क्रमांक एकमध्ये सर्वसाधारण व सर्वसाधारण स्री, प्रभाग क्रमांक दोनमध्ये सर्वसाधारण स्री, अनुसूचित जमाती व अनु-जमाती स्री, नगरदेवळा बुद्रुक येथे प्रभाग क्रमांक दोनमध्ये सर्वसाधारण, पहाण प्रभाग क्रमांक एकमध्ये सर्वसाधारण स्री, लासुरे येथील प्रभाग क्रमांक तीनमध्ये सर्वसाधारण, बांबरूड बुद्रुक (प्रभ) येथे प्रभाग क्रमांक दोनमध्ये सर्वसाधारण स्री, डोंगरगावच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये नामप्र या प्रमाणे १२ ग्रामपंचायतींच्या १९ जागांसाठी निवडणूक होत आहे.

२२ रोजी मतमोजणी
निवडणुकीसाठी ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. ७ डिसेंबरला छानणी, ९ डिसेंबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. आवश्यक असल्यास २१ डिसेंबरला मतदान तर २२ राेजी मतमोजणी केली जाणार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज