एरंडोल तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या १३ जागांसाठी पोटनिवडणुक

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२१ । एरंडोल तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या १३ जागांसाठी पोटनिवडणूक होत असून त्यासाठी ६ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. २१ डिसेंबर रोजी मतदान होऊन २२ रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे. अशी माहिती तहसीलदार सुचिता चव्हाण व नायब तहसीलदार एस.पी. शिरसाट यांनी दिली आहे.

अंतुर्ली खुर्दला सर्व साधारण एक जागा, भातखेडा नामाप्र एक जागा, जवखेडे सिम सर्व साधारण एक जागा, तळई सर्वसाधारण एक जागा, उत्राण गुजर हद्द अनुसूचित जमाती एक जागा, विखरण ३ जागा अनुसूचित जमाती, नामाप्र, सर्वसाधारणपणे, पिंपळकोठा बुद्रुक नामाप्र स्त्री, रिंगणगाव अनुसूचित जमाती एक जागा, रवंजे बुद्रुकला अनुसूचित जमाती, सर्व साधारण अशा दोन जागा जागांसाठी ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -