शिरसोलीत व्यवसायिकाची गळफास घेत आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२१ । शिरसोली येथील ५० वर्षीय व्यक्तीने मध्यरात्री राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेले आहे.

सविस्तर असे की, संजय नारायण मिस्त्री ( वय ५०, रा. शिरसोली ता. जि. जळगाव ) हे वेल्डिंग मिस्तरी चे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. बुधवारी २४ नोव्हेंबर रोजी रात्री कुटुंबीयांसह जेवण करून ते वेल्डिंगच्या पत्र्याच्या शेडमध्ये जाऊन झोपले.

दरम्यान, मध्यरात्री त्यांनी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज सकाळी त्यांचा लहान मुलगा नितीन हा पाणी तापवण्यासाठी हिटर लावण्यासाठी गेला असता हा प्रकार लक्षात आला. आत्महत्या केल्याचे उघड झाल्यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

त्यांच्या पश्चात पत्नी सविता व राकेश आणि नितीन हे दोन मुले तर विवाहित मुलगी प्रियंका असा परिवार आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज