fbpx

भुसावळात भरधाव चारचाकी बसवर आदळली : चौघे जखमी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२१ । भरधाव चारचाकी बसवर आदळून झालेल्या अपघातात चौघे जखमी झाले. शहरातील राष्ट्रीय महामार्गावर सुभाष गॅरेजजवळ मंगळवारी मंगळवारी दुपारी हा अपघात झाला. शहर पोलिसात या प्रकरणी मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

जळगाव आगाराची जळगाव- बर्‍हाणपूर बस (एम.एच.14 बी.टी.2177) ही जळगावकडून भुसावळ शहरात ओव्हरटेक करीत येत असतानाच समोरून येणार्‍या इरटीका कार (एम.एच.04 जी.ई.6662) ने जोरदार धडक दिल्याने बसचे दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले तर कारमधील चार जण जखमी झाले. 

मात्र ते तातडीने जळगाव येथे उपचारासाठी निघून गेल्याने त्यांची नावे समजली नाहीत. बससमध्ये 16 प्रवासी होते, मात्र कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. याबाबत एसटीचे चालक सुरेश धोंडू सोनवणे (रा.हुडको कॉलनी, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज