fbpx

शनीपेठ परिसरातील रहिवाशाला गच्चीवर झोपणे पडले महागात

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ एप्रिल २०२१ । शनीपेठ परिसरातील रहिवाशाला गच्चीवर झोपणे चांगलेच महाग पडले आहे. ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करीत रोकडसह ३७ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला.  याप्रकरणी रात्री उशीरा शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील शनीपेठ परिसरातील रहिवाशी व शहरातील शासकीय तंत्रनिकेतनमधील लघुलेखक महेश शांताराम पाटील हे आपल्या आई, वडील, पत्नी व मुलीसह चौघुले प्लॉट परिसरातील हनुमानमंदिराजवळ वास्तव्यास आहे. दरम्यान, घरातील सदस्य आतील दरवाजा व जिन्याच्या लोखंडी दरवाज्याला कुलूप लावून वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले. रविवारी मध्यरात्री १२.३० ते ४.४५ वाजेच्या सुमारास चोरट्यानी त्यांच्या घराच्या लोखंडी दरवाजाचे व आतील दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत कुलूप शेजारी असलेल्या गटातीत फेकून दिली. 

चोरट्यांनी घरात प्रवेश केल्यानंतर महेश यांच्या पॅन्टच्या खिशातून ५ हजार त्यांच्या वडीलांच्या पँन्टमधून ३ हजार ५००, कपाटातील त्यांच्या आईच्या पर्समधील ६ हजार तर महेश यांच्या पत्नीच्या पर्समधील २ हजार ५०० अशी रोख रक्कम चोरट्यांन लंपास केली. तसेच घरातील लोखंडी कपाट व लाकडी कपाटातील सामान अस्ताव्यत करीत चोरटे त्याठिकाणाहून पसार झाले. याप्रकरणी सोमवारी ५ एप्रिल रोजी रात्री उशीरा चोरट्यांविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउनि खेमराज परदेशी हे करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज