खेडगांव येथे घरफोडी: १ लाख ७० हजारांचा ऐवज लंपास..!

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२२ । तालुक्यातील खेडगाव येथे कोणीतरी अज्ञात इसमाने भिमसिंग शंकर पवार यांच्या घराच्या खिडकीचे गज वाकवुन सोन्याच्या दागीन्यांसह रोख रक्कम मिळुन एकूण १लाख ७०हजार ७००रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना ८जानेवारी २०२२ रोजी पहाटे उघडकीस आली.

याप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २१ग्रँम वजनाचा सोन्याचा हार किंमत ६२ हजार रूपये, ४१हजार रू. किमतीची १६ग्रँम वजनाची सोन्याची मंगलपोत, १५हजार रू. किमतीच्या ४ग्रँम वजनाच्या सोन्याच्या रिंगा, रोकड ५२हजार रूपये रोकड असा एकूण १लाख ७०हजार ७००रूपये किंमतीच्या ऐवजावर अज्ञात चोरट्याने डल्ला मारला.

भिमसिंग पवार हे रोजच्या प्रमाणे पहाटे ५वाजता पाणी गरम करण्यासाठी मागच्या रूम मध्ये गेले असता कपडे,बँगा,पेटीतील भांडी-कुंडी घरात अस्ताव्यस्त पडलेले आढळुन आले तसेच घराच्या खिडकीचे गज वाकलेले दिसले.

याप्रकरणी पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड काँन्स्टेबल काशिनाथ पाटील, मिलींद कुमावत हे पुढील तपास करीत आहेत.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -