वरखेडी येथे बंद घरात चोरट्यांचा डाव; ९० हजारांच्या रोकड व दागिने केले लंपास

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२१ । वरखेडी ( ता.पाचोरा ) येथे बंद घरात चोरट्यांनी डाव साधला. या ठिकाणाहून रोख रकमेसह सोन्या-चांदीचा ऐवज, तसेच इन्व्हर्टरची बॅटरी असे एकूण ९० हजारांच्या रोकड व दागिने ७ रोजी भल्या पहाटे चोरून नेली. दरम्यान, दोन दिवसआधी लोहारी-पाचोरा दरम्यान पाचोऱ्याकडे दुचाकी जाणाऱ्या सराफा व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकत त्यास लुटण्याचा प्रकार घडल्याची घटना ताजी असताना ही घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सविस्तर असे की,पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील वरखेडी गावी राममंदिर परिसरात राहणारे सुनील प्रेमचंद पांडे यांच्या बंद घरात चोरट्यांनी डाव साधला. या ठिकाणाहून रोख रकमेसह सोन्या-चांदीचा ऐवज, तसेच इन्व्हर्टरची बॅटरी मंगळवार भल्या पहाटे चोरून नेली. या प्रकरणी पोलीस पाटील बाळू कुमावत यांनी पोलीस स्टेशनला कळविल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा भोये, फौजदार डिगंबर थोरात यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सुनील प्रेमचंद पांडे यांचे मोठे भाऊ, अनिल प्रेमचंद पांडे यांचा मुलगा राहुल याच्या लग्नासाठी भाऊ, पुतणे यांच्यासह सुनील पांडे हेदेखील सोमवारी दुपारी वन्हाडासह गेले आहे. घरी त्यांची पत्नी, मुली व इतर पाहुणे मंडळी हे जवळच असलेल्या त्यांच्या मोठ्या भावाकडे लग्न घरी स्वतःच्या घरास कुलूप लावून झोपण्यास गेलेले होते. चोरट्यांनी मागच्या दाराचे कुलूप उघडून घरात प्रवेश करीत सोन्या-चांदीचा ऐवज चोरून व ऑल्युमिनियमच्या डब्यात ठेवलेली रोख रक्कम ९० हजार तसेच इनव्हर्टरची बॅटरीदेखील चोरट्यांनी लांबविले. सुनील पांडे हे घरी आल्यावर ऐवजचा तपशील कळू शकणार आहे. तसेच दोन दिवसआधी लोहारी-पाचोरा दरम्यान पाचोऱ्याकडे दुचाकी जाणाऱ्या सराफा व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकत त्यास लुटण्याचा प्रकार घडल्याची घटना ताजी असताना ही घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -