बैलगाडी विहिरीत पडल्याने शेतमजुरासह एका बैलाचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२१ । यावल तालुक्यातील बामणोद शिवारात बैलगाडी विहिरीत पडल्याने शेतमजुरासह एका बैलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. विश्वनाथ रामसिंग सोनवणे (६५, रा. हातेड, ता.चोपडा, ह.मु.बामणोद, ता. यावल) असे मयत झालेल्या शेतमजूराचे नाव आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, विश्वनाथ सोनवणे हे सुरेश तुकाराम भंगाळे (बामणोद, ता. यावल) यांच्या शेतात शेती कामाच्या निमित्ताने बामणोद शिवारात १४ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजता बैलगाडीने गेले होते. दरम्यान, रात्रीच्या वेळी शेतात बैलगाडीने जात असतांना अंधाऱ्यात विहिर न दिसल्यामुळे बैलगाडीसह ते पाण्यात पडले.

यात एक बैल आणि विश्वनाथ सोनवणे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हा प्रकार सकाळी ८ वाजेच्या सुमारास लक्षात आला. सुरेश तुकाराम भंगाळे (बामणोद, ता.यावल) यांच्या खबरीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस नाईक सुधाकर पाटील करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज