जवखेडे बु.येथे विजेच्या धक्क्याने बैलाचा मृत्यू

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज | ७ सप्टेबर २०२१ |  जवखेडे बु!येथे वीजेचा धक्का बसून बैल ठार झाल्याची दुर्दैवी घटना पोळ्याच्या दुसर्याच दिवशी घडली आहे.

जवखेडे बु!येथील रहीवासी विनोद पुंडलिक पाटील यांच्या मालकीचा बैल घराजवळील खळ्यात बांधलेला असतांना सायंकाळी साडेचार वाजता जोरात विज कडाडली,जोरदार विजेच्या धक्क्याने तो जागीच ठार झाला.पशुवैद्यकीय अधिकारी अशोक महाजन यांनी मृत बैलाची तपासणी केली तर तलाठी सलमान तडवी व कोतवाल पंकज भोई यांनी पंचनामा केला.

पोळ्याच्या दुसर्या दिवशीच हे आस्मानी संकट कोसळल्याने संपूर्ण पाटील कुटुंबाला अश्रु अनावर झाले होते.विनोद पुंडलिक पाटील यांचे अंदाजे पंचेचाळीस हजारांचे नुकसान झाले आहे.या अघटीत घटनेमुळे त्यांच्या शेतातील राहिलेली कामे करणे त्यांना जिकिरीचे जाणार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar