जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२४ । जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्याच्या भूमिपुत्राला मिझोराम राज्यात कर्तव्य बजावताना वीरमरण आल्याची घटना आज १६ रोजी सकाळी समोर आली आहे. चेतन हजारे (वय २९) असं वीरमरण आलेल्या जवानाचे नाव आहे. दरम्यान या घटनेनंतर जवान चेतन हजारे यांच्या कुटुंबासह परिसरात शोककळा पसरली आहे.
पाचोरा शहरातील देशमुख वाडी भागातील २९ वर्षीय चेतन हजारे हा विवाहित तरुण मिझोराम येथील बॉर्डर सेक्युरिटी फोर्स येथे कार्यरत होता. देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना दि. १५ जून रोजी रात्री १० वाजता त्यास वीरमरण आले. सुमारे १० वर्ष त्याने देशसेवा बजावली.
त्याचे पश्चात आई, वडील, एक बहीण, जावई, पत्नी दोन मुले असा परिवार आहे. दिनांक १७ जून रोजी सकाळी ६ वाजता त्यांचे पार्थिव पाचोरा शहरातील देशमुख वाडी येथील राहते घरी आणले जाणार आहे. या घटनेने पाचोरा तालुक्यात शोककळा पसरली आहे.