पहूर येथे फोडले किराणा दुकान

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२१ । पहूर येथे चोरट्यांनी झुंबरलाल चोरडिया यांच्या स्वामी समर्थ प्रोव्हिजन किराणा दुकान  धक्कादायक घटना उघडकीस अली आहे. यावेळी किराणा दुकानाचे शटरचे कुलूप तोडून १२ ते १३ हजारांचा किराणा सामानासह ४ ते ५ हजार रुपयांची रोकड लंपास केली.

सविस्तर वृत्त असे कि, पहूर बसस्थानकाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या कृषी पंडित मोहनलाल लोढा कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या स्वामी समर्थ किराणा दुकानात  चोरीची घटना आज  सकाळी उघडकीस आली आहे.  दुकान उघडण्यासाठी आले असता समोर दुकानाचे कुलूप तोडल्याचे दिसून आल्याने घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यावर पोलिसानी   दुकानाचे शटर उघडून पाहणी केली असता दुकानातील ड्रॉवर खुले दिसून आले. तसेच दुकानातील कागदपत्र देखील अस्ताव्यस्त दिसून आले. दुकानातील मालाची तपासणी केली असता दुकानातील गावरानी तुपाचे डब्बे, तेल पाउच, काजू, बदाम, व्हील, लक्स, डव इ प्रकारचे साबण, पाउडर तसेच किरकोळ वस्तू चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळून आले आहे.

सदरील घटनेची अज्ञात चोरट्या विरुद्ध पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली असून भा.दं.सं. 1860 कलम 457 व 380 नुसार घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पहूर पोलिस स्टेशनचे  पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.  एस. आय .बनसोड साहेब, ज्ञानेश्वर ढाकरे व पोलिस कर्मचारी करीत आहे.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज