अंत्यविधीसाठी गेलेल्या व्यापाऱ्यांचे घर फोडून पावने चार लाखांची रक्कम लंपास

जळगाव लाईव्ह न्यूज | १५ नोव्हेंबर २०२१ | वहिनीच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या कापूस व्यापाऱ्याचे घर फोडून ३ लाख ७० हजाराची रक्कम लंपास करण्यात आल्याची घटना मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी बुद्रुक येथे घडली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी बुद्रुक येथील कापूस व्यापारी काशिनाथ माणकचंद गुजराती (वय-६२) यांच्या वाहिनीचे निधन झाल्याने ते त्यांच्या अंत्यविधीसाठी घोडसगाव येथे गेले होते. घोडसगाव येथे जाण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या घरातील कपाटात तीन लाख ७० हजार रुपयांची रक्कम ठेवून त्या कपाटाची चावी कपाटाजवळील एका पिशवीत ठेवली होती. अंत्यविधी आटोपल्यानंतर ते त्याच दिवशी दुपारी तीन वाजता निमखेडी येथील घरी परतले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी पैसे काढण्यासाठी कपाट उघडले, त्यावेळी त्यांना कपाटात ठेवलेले पैसे त्या ठिकाणी नसल्याचे दिसून आले होते. याबाबत त्यांनी पत्नी व मुलगी यांना विचारणा केली. मात्र त्यांना याबाबत काही माहिती नसल्याने पैसे चोरीला गेल्याचे त्यांचे लक्षात आले. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक परवीन तडवी या करीत आहेत.

चोरीच्या घटनांमध्ये वाढ
गेल्या काही दिवसांपासून मुक्ताईनगर तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कोथळी येथे घरफोडी झाली होती. त्यानंतर बुधवार दि.१० रोजी कुऱ्हा येथील बंद दुकाने फोडून या दुकानांतून २ लाख रुपयांची रोकड लांबविण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनांना काही दिवस उलटत नाही तोच पुन्हा चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज