fbpx

गोलाणी मार्केटमध्ये महिला बचत गट संचलित नाश्ता सेंटर सुरू..!

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२१ । जळगाव येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या खान्देश कन्या महिला विकास मंडळ संचलित महिला बचत गटाच्या ” नाश्ता सेंटर “या ना नफा ना तोटा  उपक्रमाचे उदघाटन आज (दि.२७ शनिवार) रोजी शिवसेनेच्या नूतन महापौर जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते फित कापून आणि कवयित्री निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले.

याप्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी मंगलाताई बारी , शिवसेना महानगर उपप्रमुख आशा खैरनार , भारती सैंदाणे, कलावंत तुषार वाघुळदे, वंदना बारी, संगीता बारी, बंटी बारी, आदिवासी एकता परिषदेचे सुनील गायकवाड, जितेंद्र पाटील, राहुल पाटील, अरुण पाटील, प्रशांत महाशब्दे ,अनिल पाटील ललित धांडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

कोरोनाच्या विदारक परिस्थितीमुळे अनेकांना उपासमारीची पाळी आली आहे. त्याचा फटका बहुतांश महिला बचत गटालाही बसला आहे. खान्देश कन्या महिला विकास मंडळ संचलित महिला बचत गटातर्फे गोलाणी मार्केट परिसरात छोटेखानी नाश्ता सेंटर आज ग्राहकांच्या सेवेसाठी सुरू झाले .त्याचे औपचारिक उद्घाटन महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महापौर म्हणाल्य , महिला बचत गटाने सुरू केलेल्या या कार्यक्रमास माझ्या शुभेच्छा आहेत. या माध्यमातून चार – पाच महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे, ही बाब निश्चितच आनंदाची असल्याचे सांगून या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार वाघुळदे यांनी तर आभार दिया बारी हिने मानले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज