ब्राह्मण सेवा संस्थेतर्फे दुर्धर आजाराने त्रस्त रुग्णांच्या कुटुंबियांना मदतीचा हात

जळगाव लाईव्ह न्यूज । २० नोव्हेंबर २०२१ ।  महाबळ येथील बाहेती शाळेत शुक्रवारी ब्राह्मण सेवा संस्थेची वार्षिक सभा पार पडली. त्यात दुर्धर आजाराने ग्रस्त तसेच कोविडने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना यावेळी संस्थेकडून प्रत्येकी ११ हजार रुपयांची मदत देण्यात आली.

यावेळी प्रा. शरदचंद्र छापेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तर अध्यक्षस्थानी वसंत देखणे होते. वार्षिक सभेचे अहवाल वाचन सचिव नंदू नागराज यांनी केले. व आर्थिक ताळेबंद व अंदाजपत्रक कोषाध्यक्ष अविकुमार जोशी यांनी सादर केले.

या कुटुंबियांना मदतीचा हात 

यावेळी दीर्घ आजाराने ग्रस्त विजय देशमुख, बळवंतराव वाकलेकर यांच्या कुटुंबीयांना तसेच कोविडने मृत्यू झालेल्या रत्नाकर बाळकृष्ण देव, किशोर वसंत काजळे, चंद्रकांत त्र्यंबक नाईक, मेघा लक्ष्मीकांत जोशी, उमेश दिनकर जोशी यांच्या कुटुंबीयांनाही मदत देण्यात आली.

विविध सूचना 

आपत्ती प्रसंगी कुटुंबीयांना मदत करून संवेदनशीलतेचे दर्शन संस्थेने घडविल्याचे मत प्रा. शरदचंद्र छापेकर यांनी व्यक्त केले. वर्षा पाठक यांनी युवा मंडळ स्थापन करण्याची मुकुंद शुक्ल यांनी महिला मंडळ व युवकांचे कार्यक्रम घेण्याची सूचना मांडली.

दरम्यान, माजी अध्यक्षा रेखा कुलकर्णी, माजी सचिव अशोक कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. जयंत संत यांनी वधू-वर मंडळ सुरू करावे, अशी सूचना केली. वरदा जोशी हिने प्रार्थना सादर केली. दरम्यान, अशोक, कुलकर्णी यांच्या घटना दुरुस्तीच्या सूचनेवरून पाच जणांनी समिती स्थापन करण्यात आली आहे. यात अध्यक्ष म्हणून वसंत देखणे, उपाध्यक्ष भूपेश कुलकर्णी, अशोक कुलकर्णी, जयंत संत, अमला पाठक यांचा समावेश आहे. आभार प्रा. वर्षा पाठक यांनी मानले. ऋतुजा संत यांनी निवेदन केले. विद्या धर्माधिकारी यांनी चर्चेत सहभाग नोंदविला

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज