‘त्या’ हल्ला करणाऱ्या दोघांना चार दिवसाची पोलीस कोठडी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२१ । जुन्या वादातून एका तरुणावर चाकूने हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी संशयित आरोपी गुरुवारी संदीप पोपट पाटील (२२) व शिवाजी कडूबा पाटील (५०, रा. खेडी बु.) या दोघांना अटक केली.व न्यायालयात हजार केले असता. न्यायालयाने दोघांना ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

धनराज गजानन कोळी (२२, रा.खेडी बु.) याने भावेश पोपट पाटील याला उसनवारीचे पैसे दिले होते. त्यावरून १६ डिसेंबर रोजी संदीप भावेश व शिवाजी दोघांनी धनराज याला शिवीगाळ केली होती. त्याचा जाब विचारला असता दोघांनी धनराज याला मारहाण केली तर भावेश याने चाकूने पोटावर व मानेवर वार केले होते. सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांना संदीप व शिवाजी या दोघांची माहिती मिळाली.

सहायक फौजदार अतुल वंजारी, जितेंद्र राठोड, समाधान टाहकळे, सचिन मुंडे, यशोधन ढवळे व इम्तियाज खान यांनी बुधवारी रात्री दोघांना ताब्यात घेतले. गुरुवारी अटक केल्यानंतर न्या.ए.एस. शेख यांच्या न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे अॅड. स्वाती निकम यांनी बाजू मांडली. सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे व किरण पाटील तपास करीत आहेत.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -