पैशांच्या कारणावरून दोघांना बेदम मारहाण; सहा जणांविरोधात गुन्हा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२१ । केकत निंभोरा ( ता. जामनेर ) येथे घेतलेले पैसे परत न दिल्याच्या कारणावरून तरुणांसह त्याच्या मामाला मारहाण करत घरातून पाच लाख रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने नेल्याचा प्रकार २६ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे की, तुषार पुंडलीक पाटील रा. केकत निंभोरा ता. जामनेर यांनी संशयित आरोपी राहुल दत्तात्रय चव्हाण रा. जामनेर याच्याकडून उसनवारीने पैसे घेतले होते. दरम्यान, तुषार पाटील यांचा भाचा विनोद रामचंद्र पाटील (वय २४,) रा. मांडवा खुर्द ह. मु. केकत निंभोरा ता.जामनेर याच्याकडे येऊन मामा यांनी घेतलेले पैसे का देत नाही. या कारणावरून विनोद पाटील याला संशयित आरोपी राहुल दत्तात्रय चव्हाण, शुभम शिवाजी पाटील, चेतन सिताराम शिंदे रा.केकत निंभोरा, सागर दत्तात्रय चव्हाण, धनराज माळी आणि धनराजचा भाऊ ( नाव पूर्ण माहीत नाही ) रा. जामनेर यांच्यासह काही जणांनी २६ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास तुषार पाटील यांना पैशांची मागणी केली. या कारणावरून तुषार पाटील यांच्या घरात अनधिकृतपणे वरील मंडळींनी घुसून घरातील पाच लाख रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने हिसकावून घेऊन लोखंडी रॉडने मारहाण केली.
यात दुचाकीचे देखील नुकसान झाले आहे. विनोद पाटील यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -