fbpx

ऑक्सिजनअभावी पाचोऱ्यात दोघांचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२०१ । पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शनिवारी ३० रुग्ण उपचार घेत असताना ऑक्सिजन संपल्याने प्रचंड खळबळ उडाली. त्यात महेश राठोड (वय २२, रा. कुऱ्हाड बुद्रुक, ता. पाचोरा) व ग्यारसीबाई चव्हाण (वय ७६, रा. हनुमंतखेडा, ता. सोयगाव) या दोघांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे.

ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा संपल्याने उपचारार्थ दाखल असलेल्या रूग्णांचे जीव धोक्यात आल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांना कळताच त्यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला.

mi advt

ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत झालेल्या दोघांची स्थिती प्रथमपासूनच बिकट होती. त्यात ऑक्सिजनचा प्रश्र बिकट झाला. ऑक्सिजन सिलिंडर दररोज मागवले जातात. गाडी उशिरा आल्याने असा प्रसंग ओढवला. आता ऑक्सिजनचे १८ सिलिंडर प्राप्त झाले असून, दररोज दोन वेळा जळगाव येथे गाडी पाठवून सिलिंडर मागवले जातात. सर्व रुग्णांची परिस्थिती आता ठीक असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज