fbpx

एरंडोल येथे दोघांचा मृत्यू

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२१ । एरंडोल येथील गांधीपुरा भागातील महादेव मंदिराजवळ राहणारे सुरेश सखाराम कुदाळे (वय ४३) यांचा चुनाभट्टी परिसरातील अंजनी नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.तर उत्राण गु.ह. येथील रहिवाशी रमेश रामचंद्र लोहार (वय ६५) यांचे प्रेत जहांगीर पुरा भागातील महादेव मंदिराच्या मागे आढळून आले. एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.विशेष हे की दोघं अती मद्य प्राशन करणारे होते.

याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन वरुन मिळालेल्या माहिती नुसार दि.१४ मार्च रोजी सकाळी आठ वाजे पूर्वी एरंडोल शहरातील अंजनी नदीच्या जवळ असलेल्या चुनाभट्टी जवळ नदीच्या पाण्यात सुरेश कुदाळे यांचे प्रेत आढळून आले.दरम्यान सुरेश चे प्रेत हे अती मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आले आहे.यावरून एरंडोल पोलीस स्टेशनला सुरेश यास अत्यंत दारु पिण्याची सवय असल्याने त्याने दारूच्या नशेत आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.दरम्यान उद्या दि.१५ मार्च रोजी सुरेश च्या मुलीचे लग्न होते.आज हळद होती.त्यातच सुरेश च्या मृत्यूने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

किशोर सखाराम कुदाळे यांच्या फिर्यादवरून एरंडोल पोलीस स्टेशनला अ.मु. रजि.नं. 11/2021 सी.आर.पी.सी. 174 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे तसेच एरंडोल तालुक्यातील उत्राण गु.ह.येथील रहिवाशी रमेश रामचंद्र लोहार (वय६५) हे उत्राण येथील त्यांचा मुलगा सागर रमेश लोहार यांच्या कडे राहतात.ते थोडे वेडसर असुन त्यांना अत्यंत दारु पिण्याची सवय होती व ते नेहमी कोणालाही काही एक न सांगता घरातुन निघुन जात असल्याचे सागर याने फिर्यादीत सांगितले आहे.त्यांचे प्रेत आज दि.१४ मार्च रोजी एरंडोल येथील जहांगीर पुरा भागातील महादेव मंदिराच्या मागे आढळून आले.दरम्यान एरंडोल पोलीस स्टेशनला त्यांचा मुलगा सागर रमेश लोहार यांच्या फिर्यादीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अनिल पाटील,संदिप सातपुते करीत आहेत.

यावेळी गांधीपुरा भागातील रहिवाशांनी एरंडोल शहरात ये जा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या अरुंद पुलाचे रुंदीकरण व्हावे अशी मागणी केली आहे कारण नेहमी या पुलांवरून ये जा करणाऱ्यांना पुलावरून चालण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.अनेक वेळेस लहान बालक,वयोवृद्ध या पूलांवरून खाली पडली आहे.परंतु आजच्या घटनेने मात्र पुऱ्यातील रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज