फवारणी करताना औषध नाकातोंडात गेल्ल्याने दोघांचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२१। शेतात फवारणी करताना विषारी औषध नाकातोंडात गेल्याने दोन प्रौढांचा मृत्यू झाल्याच्या घटना पारोळा तालुक्यात घडल्या आहेत. तालुक्यातील, विचखेडा व शिरसमणी येथे या घटना घडल्या आहेत.

दयाराम भगवान बारी (रा. बारी गल्ली, पारोळा) हे विचखेडा शिवारातील राजू महाजन यांच्या शेतात फवारणी करत होते. फवारणी करतांना त्यांच्या नाकातोंडात विषारी औषध गेले. त्यामुळे त्यांना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी उपचार घेत असताना दि.१५ रोजी दुपारी त्यांचा मृत्यू झाला.

तर दुसऱ्या घटनेत शिरसमणी येथील धनराज दगा पाटील (वय-५५) हे दि.१५ रोजी स्वत:च्या शेतात फवारणी करत होते. त्यांचाही नाकातोंडात विषारी औषध गेल्यामुळे त्यांना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज