उधार पैसे न दिल्याने एकाचे डोके फोडले

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२१ । शहरातील तांबापुराजवळ असलेल्या मच्छीबाजार परिसरात उधार पैसे न दिल्याने आणि जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी एकाचे डोके फोडल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल आहे.

सुप्रीम कॉलनीत राहणारे संजय इच्छाराम पाटील वय-४७ हे दि.५ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास मित्र अनिलसोबत मच्छीबाजार परिसरात नाश्ता करण्यास गेले होते. दोघे उभे असताना ईश्वर, पिन्या आणि आणखी एक जण त्याठिकाणी आला. तू तुझी गाडी विकल्यावर आलेल्या पैशातून इतरांना पैसे दिले पण मला उधार पैसे दिले नाही.

तू माझ्या भावाला पण शिवीगाळ केली. अशा मागील भांडणाच्या कारणावरून ईश्वर याने मारहाण करत लाकडी काठीने संजय यांच्या डोक्यावर आणि पाठीवर मारहाण केली. इतरांनी देखील चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. संजय हे रक्तबंबाळ झाल्याने अनिल याने वाद सोडवित त्याला दवाखान्यात दाखल केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार प्रदीप पाटील करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -