बोरोले यांना पॉल हॅरीस फेलो सन्मान

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ डिसेंबर २०२१ । चोपडाचे रोटरी क्लब ऑफ अध्यक्ष पंकज बोरोले यांना पॉल हॅरीस फेलो हा सन्मान जाहीर झाला असून, हा सन्मान रोटरी फाऊंडेशन या संस्थेस ३५० अमेरिकन डॉलरचे योगदान देणाऱ्या व्यक्तींस दिला जातो.

रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष पंकज बोरोले यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यापासून विविध समाजोपयोगी कार्य केली आहेत. त्यात रामपुरा भागात वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, आदिवासी कुपोषित बालकांना व मातांना सक्षम करणे तसेच लसीकरण इत्यादी उपक्रम हाती घेतले आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -