fbpx

दुर्दैवी योगायोग… दहा वर्षापूर्वी ज्या झाडावर भावाने केली होती आत्महत्या त्याच झाडाला दुसऱ्यानेही घेतला गळफास

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २ सप्टेंबर २०२१ । धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथील शेतकऱ्याने मुलगा, पत्नी आणि घरातील सर्वजण झोपलेले असताना, मध्यरात्री शेतात जाऊन कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेतला. दुर्दैवी योगायोग असा की, मृत कैलास पाटील यांनी आपल्या शेतातील ज्या झाडाला गळफास घेतला होता, त्याच झाडाला गळफास घेऊन दहा वर्षांपुर्वी त्यांच्या भावानेदेखील आत्महत्या केली होती.

मृत कैलास पाटील यांनी आत्महत्या करण्यापूर्वी मुलाला आणि नातेवाईकांना फोन करून मला जगायचं नाही…. माझा हा शेवटचा फोन.. असा संवाद साधला. त्यामुळे पाटील यांच्या कुटुंबियांनी मध्यरात्री आपले शेत गाठले. रात्रीच्या अंधारातच शेतात शोधाशोध केली, त्यावेळी कडुनिंबाच्या झाडाला कैलास पाटील यांनी गळफास घेतल्याचे दिसले. याच झाडाला दहा वर्षांपुर्वी त्यांच्या भावानेदेखील आत्महत्या केली होती.

मृत कैलास पाटील यांच्या आत्महत्येमुळे गावात सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेमुळे गावात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. काही दिवसांपासून मृत कैलास पाटील नैराश्यात होते, त्यातूनच त्यांनी जीवन संपवले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज