fbpx

बोरी धरणाचा एक दरवाजा उघडला ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२१ । बोरी धरणाचे पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आज 25 ऑगस्ट रोजी सकाळी 8.00 वाजता बोरी धरणाचा एक दरवाजे 0.15 मीटरने उघडण्यात आला असून बोरी नदीपात्रात 451 क्युसेक्स पाणी प्रवाह सोडण्यात आला आहे.

तरी बोरी धरणाचे खालील नदी काठावरील गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून बोरी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. नागरिकांनी जीवित वा वित्तहानी टाळण्याच्यादृष्टीने योग्य ती खबरदारी घ्यावी. असे आवाहन कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यांचेतर्फे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज