fbpx

केंद्राच्या योजना बुथ प्रमुखांनी तळागाळापर्यंत पोहोचवा-आ. गिरीश महाजन

यावल येथे भाजपचा डॉ.शामाप्रसाद मुखर्जी समर्थ बुथ अभियान कार्यकर्ता मेळावा संपन्न

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२१ । केंद्र शासनाच्या महत्वकांक्षी योजना तळागाळातील सामान्य माणसांपर्यंत केंद्र व बुथप्रमुखांनी पोहोचवा. त्यामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणूका आपण सहज जिंकू असे आवाहन माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीष महाजन यांनी आज येथे केले.भाजपच्या डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी समर्थ बुथ अभियान कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.यावल येथील धनश्री चित्र मंदिरात हा मेळावा काल घेण्यात आला.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा आमदार गिरीष महाजन होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रक्षाताई खडसे, जि.प. अध्यक्षा रंजना पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजू मामा भोळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, संघटनमंत्री रवी अनासपुरे उपस्थित होते. प्रसंगी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, सुरेश धनके, पद्माकर महाजन, मसाका अध्यक्ष शरद महाजन, नंदकिशोर महाजन, जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, सचिन पानपाटील, जि.प. सदस्य तथा आरोग्य सभापती रविंद्र पाटील, जि.प. सदस्य सविता भालेराव, पं.स. सभापती पल्लवी चौधरी, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष पुरुजित चौधरी, उपसभापती योगेश भंगाळे, नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, प. स. गटनेता दीपक पाटील, लक्ष्मी मोरे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष नारायण चौधरी, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष आरिफ शेख, जिल्हा बँक संचालक गणेश नेहेते, प्रदेश सदस्य मीना तडवी, नरेंद्र नारखेडे, रावेर तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत देशमुख आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते भारतमाता, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन व दीपप्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन झाले.

mi advt

जिल्ह्यात पक्ष मजबूत- आ.राजूमामा भोळे

याप्रसंगी आमदार राजू मामा भोळे म्हणाले की जिल्ह्यात पक्षाची स्थिती मजबूत असुन आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजपाचे सदस्य निवडून येतील,यावल तालुक्यातील सर्वच जागांवर भाजपा विजयी होईल असेही ते म्हणाले. तर नंदकिशोर महाजन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त २ आक्टोबरपर्यंत सलग सोळा दिवस पक्षातर्फे विविध कार्यक्रम घेतले जाणार असल्याची माहीती त्यांनी दिली.यावेळी जिल्हा किसान मोर्चातर्फे निवृत्त सैनिक, व प्रगतशील शेतकरी यांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष कांचन फालक, बाजार समिती उपसभापती उमेश पाटील, नितीन राणे, डॉ. नरेंद्र कोल्हे, भरत महाजन, हेमराज फेगडे, उमेश फेगडे, शहराध्यक्ष निलेश गडे, अतुल भालेराव, उज्जैन सिंग राजपूत, व्यंकटेश बारी,फैजपूर शहराध्यक्ष अनंत नेहेते,फैजपूरचे माजी नगराध्यक्ष निलेश राणे, देविदास पाटील, किशोर कुलकर्णी, सागर कोळी, विद्या पाटील, फैजपूर येथील दिपाली चौधरी झोपे, सरला कवडीवाले आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक तालुकाध्यक्ष उमेश फेगडे यांनी केले. सूत्रसंचालन विलास चौधरी यांनी केले. तर आभार बाजार समितीचे संचालक राकेश फेगडे यांनी मानले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज